जय भवानी मित्र मंडळा विषयी!


जय भवानी मित्र मंडळ संचालित "जुईनगरचा राजा" नवी मुंबईतील काही ठराविक नामवंत मंडळापैकी एक हे जयभवानी मित्र मंडळ मंडळाचा पूर्व इतिहास असा कि सन २००२ च्या आसपास आम्ही भक्तगण मुख्य मुंबई नगरी तून नवीमुंबईतील जुईनगर, मध्ये स्थायिक झालो. स्टेशन पासून डाव्या बाजूस म्हणजेच पश्चिमेकडे सिडकोच्या इमाररती मध्ये तुरळक वस्ती होती मधोमध जुईपाडा गाव व आजूबाजूस आमची नवीन वस्ती इथला चाकरमानी सकाळी उठायचा ते फक्त एकच उदिष्ठ ठेऊन ते म्हणजे वेळेवर रेल्वे पकडुन आपल्या कामावर जाणे व सुरक्षित घरी परत येणे रात्री चोरांची व सरपटनाऱ्या श्वापदांची भीती मनात ठेऊन नवीन वस्ती जगात होती आपल्या शेजारी कोण राहतोय हे हि कित्येकांना ठाऊक नव्हते. यावर उपाय म्हणून काही मंडळी एकत्र आली परंतु उददेश सध्या होत न्हवता इतक्यात दृष्टांत घडावा तशी गणेशोत्सवाची कल्पना पुढे आली व त्याच बरोबर पूर्वीचा इतिहास डोळ्या समोर आला इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल लोकमान्य टिळकांना अत्यंत चीड होती. त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची करणे, भारतीयांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना हि होती जो पर्यंत लोकांना त्यांचा धर्म संस्कृती आणि इतिहास बद्दलचा आदर पुन्हा वृधिंगत होत नाही तो पर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे
ज्या धर्तीवर लोकमान्यांनी १८९३ मध्ये जुन्या काळा पासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरुपात पुनरोजिवन केले आणि समाजातील एकोपा वाढविन्या वर भर दिला त्याच धरती वर जुईनगर मधील समस्त जनतेने एकत्र येयून राजाची स्थापना केली सन २००२ साली पहिल्या वर्षी गुरुछाया, राधाकृष्ण, ओम साईसिद्धी सोसायटी व स्थानिक समाजसेवक श्री.श्रीधर माधवी याच्या पुढाकाराने गणरायाची स्थापना गुरूछाया सोसायटी च्या आवारात करण्यात आली. या वर्षी मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून सन २००३ साली एका कार्यकारी मंडळाची स्थापना झाली व हा उत्सव "जयभवानी चौक" येथे सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून वृधिंगत झाला या सगळ्या मागे अर्थात आशीर्वाद होते ते "जुईनगरच्या राजाचे" इवलेसे लावलेले रोप बघता बघता त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले ते सर्व "जुईनगरच्या राजा" च्या मेहनती कार्यकर्त्यान मुळे……
जणू साक्षातकार घडावा आणि एका कार्य कर्त्याने तो बोलून दाखवावा आणि आमच्या लाडक्या "जुईनगरच्या राजाने" तो साक्षात्कार पूर्णत्वास न्यावा हे जणू आता एक संघ समीकरणच होऊन बसले आहे या सर्व प्रवासात मंडळाला साथ मिळाली ती अर्थात आमच्या अभेद्य जयभवानी मित्र मंडळाच्या कार्यास वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या "जुईनगरच्या राजा" चे गोडवे गाणाऱ्या जुईनगर मधील जनतेची
"असा हा सर्वांग सुंदर उत्सव वृद्धिंगत व्हावा या साठी आम्ही तुम्हा सर्वाना या प्रवाहात मंडळाचे सभासद होऊन राजाची सेवा करण्याचे आपले योगदान देण्याचे आव्हान करतो
पुढे वाचा ...

इतर माहिती


कार्यकारिणी सदस्य

कार्यकारी मंडळ पाहण्या साठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवासाठी मार्ग

जुईनगर स्टेशन वरून कसे पोहोचाल पाहण्या साठी येथे क्लिक करा

सोशल मिडिया

सोशल मिडीयावर आम्हाला भेट देण्या साठी येथे क्लिक करा

सामाजिक उपक्रम

मंडळा द्वारे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमान विषयी माहिती साठी येथे क्लिक करा

संपर्क साधा!


जुईनगरच्या राजाच्या अधिकृत वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे
जय भवानी मित्र मंडळा च्या वतीने वर्ष भरात गणेशोत्सव, महाशिवरात्र, होळी व इतर सन व अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात
जर आपणही मंडळाच्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल तर तुमचे स्वागत आहे
आमच्याशी संपर्क करण्यास इच्छुक आसल तर आम्हाला इ-मैल करा: Juinagarcharaja@gmail.com किवा आमच्याशी संपर्क करा ९९८७५०१२३५

तसेच आपल्या काही सूचना किवा संदेश असल्यास तो वरील इमेल आयडी वर पाठवावा !

959-441-2903